मला मराठी वाचनाची आणी लेखनाची मनापासुन आवड आहे. जे काही थोडेफार लिहिले त्यापैकी काही माझ्या मलाच आवड्लेल्या कविता पोस्ट करित आहे.
अजुन बय़ाच कविता आहेत, पण टाईप व्हायच्या आहेत.
झाल्या की सगळ्या पोस्ट करिन.
स्वतःबद्दल फार काही सांगु नये असं म्हणतात...
पण मी सध्या मराठी चरित्र कोश ( जो १२ भागांचा असेल) त्यावर काम करित आहे.
सोबत पी.एच.डी. ची पण तयारी सुरु आहे.
ह्या सोबतच , साप्ताहिक विवेक मधे ललीत लेखन सुरु आहे..
शक्यतो, ईथे मी माझे कुठेतरी छापुन आलेले साहित्यच पोस्ट करते.